घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखरेंचे खोटे कारनामे : शासकीय नियमांची खरेकडून नेहमीच पायमल्ली; सहकार खात्याकडून मात्र...

खरेंचे खोटे कारनामे : शासकीय नियमांची खरेकडून नेहमीच पायमल्ली; सहकार खात्याकडून मात्र चौकशीचा देखावाच!

Subscribe

नाशिक : राजलक्ष्मी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत लाचखोर उपनिबंधक सतीश खरे याने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करून विशिष्ठ उमेदवारांना निवडून येण्यासाठी बेकायदेशीर कृती केली. सतीश खरे याने शासकीय नियमांची जाणीवपूर्वक पायमल्ली केल्याचा ठपका सहकार मंत्रालयाने ठेवलेला असताना त्याच्या विरूद्ध कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने सहकार विभागातील चौकशी यंत्रणा कूचकामी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरे विरूद्ध झालेल्या तक्रारींमध्ये अनेकदा त्याला क्लिनचिट मिळाल्याने सहकार विभाग संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

लाचखोर सतीश खरे हा शहरातील राजलक्ष्मी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी असताना बँकेची निवडणूक प्रक्रिया त्याने नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने राबविल्याचा आरोप झाल्यानंतर ५ जून २०२० च्या नोटिसीद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या ८ अन्वये दोषारोप बजावण्यात आले होते. खरे विरूद्ध असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या चौकशीत झालेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात न घेताच खरे याला बहुतेक आरोपांबाबत क्लिनचीट देण्यात आली. इतकेच नाही तर निवडणूक निर्णय अधिकारी असताना निबंधकाविरूद्ध कोणताही वाद, खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई करता येणार नाही या तरतूदींचा पुरेपूर वापर करून खरे याला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावरूनच खरे याला त्याच्या विभागातून पूर्णत: पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. तक्रारदार महेंद्र काटकर यांनी याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर सहकार मंत्रालयाने मात्र विभागीय सहकार खात्याचा अहवाल फेटाळून लावला. खरेने राजलक्ष्मी बँकेची निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने राबविल्याचे सहकार मंत्रालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करताना महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक) नियम २०१४ मधील नियम २७(२), २७(४), नियम ३२ चे उल्लंघन केल्याचा ठपका मंत्रालयाने ठेवला. त्यातूनच सतीश खरे याला निवडणूक प्रक्रियेपासून लांब ठेवण्याचे आदेश देण्यात आले. असे असतानाही हा केवळ चौकशीचा फार्स असल्याचे दिसून येत आहे. कारण सतीश खरे याच्या विरूद्ध केवळ ठपका ठेवण्यात आला. त्याच्यावर कुठलीही कडक कारवाई न केल्याने त्याचे धाडस वाढले. त्यानंतर त्याने सटाणा मर्चंट्स बँकेतही तोच कित्ता गिरवला. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे आतातरी सहकार विभाग खरे विरूद्ध कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -