घरमहाराष्ट्रवक्तव्य आणि प्रसिद्धीचे इंदुरीकर महाराज कनेक्शन, वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेतले 'सरस' कीर्तनकार

वक्तव्य आणि प्रसिद्धीचे इंदुरीकर महाराज कनेक्शन, वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेतले ‘सरस’ कीर्तनकार

Subscribe

आपल्या अनोख्या शैलीतील किर्तनामुळे इंदुरीकर महाराज या नावाने अवघ्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले निवृत्ती काशिनाथ देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. विनोदी वक्तव्य आणि इंदुरीकर महाराज यांचं अनोखं कनेक्शन आहे. कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यापुढे पुन्हा अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध दाखल खटला रद्द करण्याचा आदेश मार्च महिन्यात संगमनेरच्या सत्र न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा दावा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर संगमनेर दिवाणी न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने पीसीपीएनडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेर न्यायालयाने या प्रकरणात इंदुरीकर महाराज यांना दिलासा देत खटला रद्द केला होता. या आदेशाला अंनिसकडून आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांना नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते नेमकं इंदुरीकर?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी अपत्य होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.’

या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चे हे उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल असे म्हटले होते . त्यामुळे अखेर १९ जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

इंदुरीकरांची चर्चेत असलेली काही वादग्रस्त विधानं

  • “चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभती? बायको आहे ती. तिनं त्या मापात असावं.”
  • “पोरीच्या अंगात जितके कपडे कमी, तितकी पोरगी फटकावली पाहिजे.”
  • “नोकरीवाल्याच्या बायकांनो सांगा, काय काम करता तुम्ही? लाज धरा लाज.”
  • “नवरदेवापुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात, अरे खानदान तपासा आपले कोणते आहेत?”
  • “पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा. की बुडवला धर्म?”
  • “पोरीयलाबी अकली नाही राहिल्या. कुणावरबी प्रेम करायला लागल्या. आम्ही एका वर्गात होतो आणि प्रेम झालं म्हणे. कानफाड फोडलं पाहिजे.”
  • “गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या.”

इंदुरीकर महाराजांची ओळख?

निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज हे नाव घराघरात पोहोचलं आहे. ग्रामीण भागात विनोदी कीर्तनं करून लोकांना चार आध्यात्मिक गोष्टी सांगणारे इंदुरीकर महाराज सोशल मीडियामुळे शहरांमध्येही पोहोचले आहेत. इंदुरीकर महाराज नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असले तरी त्यांचे खरे नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. अध्यात्म आणि ‘चालू’ घडामोडी यांचा इंदुरीकर महाराज यांचा व्यापक अभ्यास आहे. ते हजरजबाबी असून आपल्या किर्तनातून व्यक्त होणाऱ्या स्पष्ट वक्तेपणासाठी ते प्रसिद्ध आहेत.

इंदुरीकर महाराज हे समाजातील विविध घटना घडामोडी यांववर तिखट शब्दात प्रहार करतात. त्यांच्या किर्तनाचा बाज हा विनोदी असला तरी त्यातील आशय हा वास्तवाला भिडणारा असतो. असे असले तरी वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे निवृत्ती काशिनाथ देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावावरुन त्यांना इंदुरीकर हे नाव पडले. काही लोक त्यांचा ‘उल्लेख इंदुरीकर महाराज’ असाही करतात.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -