farm laws: देशात नेहमी चांगल्याला विरोध केला जातो, कृषी कायद्यांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

farm laws chandrakant patil reply on farm laws withdrawn decision of modi
farm laws: देशात नेहमी चांगल्याला विरोध केला जातो, कृषी कायद्यांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

देशातील वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मोदी सरकारने मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेतले असल्याची घोषणा केली आहे. यावर काही भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली तर कोणी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. या देशात नेहमी चांगल्या गोष्टीला विरोध करण्यात येतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कायदा रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगला दर मिळण्यामुळे आनंद मिळणार होता सुख मिळणार होते. मात्र ते पर्याय नाही म्हणून कायदे मागे घ्यावे लागत आहेत. अनेक महिने आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. परंतु एक विशिष्ट या कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा फटकारले होते की, या कायद्यांवर स्थगिती आहे तर आंदोलन का करता? तुम्ही इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करु शकत नाहीत. असे सर्वोच्च न्यायालायने म्हटलं असताना शेतकरी मागे हटले नाही त्यामुळे अतिशय दुःखाने मोदींनी हा निर्णय मागे घेतला आहे.

शेतकऱ्यांना मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी यामध्ये होती. यामध्ये काय चुकीचे आहे. शेतकऱ्यांना समितीने चांगला भाव दिला तर तो बाजारामध्ये विकू शकत होता. पण बाजाराच्या बाहेर विकण्यासाठी जी परवानगी होती ती मिळणार होती. यामुळे दर आटोक्यात येणार होते. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्याची काय गरज नव्हती असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

अॅग्रीकल्चरल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अनेक ठिकाणी राबवली जात आहे. बारामतीमध्येही राबवली जात आहे. ज्यामध्ये मूळ मालकी शेतकऱ्याची राहणार त्याचे येणाऱ्या उत्पादनावर त्याचे कंत्राट होते. त्याला बरा रेट आणि चांगले तंत्रज्ञान मिळते. कारण जमीन मोठी कंपनी घेते आणि अद्ययावत तंत्रज्ञान वापरते चांगले उत्पन्न घेते आणि त्यातील काही भाग शेतकऱ्यांना देते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागताना अशी भावना व्यक्त केली की, एका छोट्या समुदायाला समजवण्यात अपयश आलं आहे. परंतु फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. पण देशातील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. यावर स्थगितीच असू द्या आणि पुन्हा एकदा समजावून ते कायदे आणण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा : farm laws: कायदा मागे घेतल्यामुळे शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, दरेकरांची प्रतिक्रिया