‘राऊतांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो’; चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

chandrakant patil criticize sanjay raut said he play double role after mamata banerjee
'ममतांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर' यालाच डबल ढोलकी म्हणतात, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा

कृषी कायदे मागे घेतल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शोक झाला असेल त्यांची मानसिकता तपासावी लागेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत शनिवारी म्हणाले. यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो, असं प्रत्युत्तर दिलं. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. हे कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली. यावर बोलताना संजय राऊत यांनी माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेन. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

यावर चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत डॉक्टर आहेत, निम्मे आहेत. त्यामुळे आणखी डॉक्टर न शोधता मी त्यांच्याकडे जातो. म्हणजे आमचा संवादही होईल. अलीकडे नवाब मलिक, राऊत काही संदर्भ नसताना, लोकांना जे खोटं वाटतं ते का बोलतात असा संवाद साधेन, असं म्हणत त्यांनी माझी मानसिकता चेक करावी, मी त्यांचं डोकं चेक करतो,” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं.