farm laws: कायदा मागे घेतल्यामुळे शरद जोशींचा आत्मा अस्वस्थ झाला असेल, दरेकरांची प्रतिक्रिया

farm laws pravin darekar reply on farm laws sharad joshi soul is restless

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांची माफी देखील मागितली आहे. कायदे मागे घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने शरद जोशी यांचा आत्मा अस्वस्थ झाला असेल अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगली सुरुवात करुया असे म्हटंल आहे. परंतु दरेकरांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटलं आहे. शरद जोशी हे शेतकरी नेते होते त्यांची भूमिका होती की शेतकऱ्यांचा माल हा बांदावरच विकला जावा तसेच शेतकऱ्यांना बाजारात स्वतः माल विकता यावा यासाठी ते प्रयत्नशील होते असे दरेकरांनी सांगितले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, अट्टहास करणं म्हणजे आंदोलनातील हवा निघून गेली आहे. मोदींनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे केला आहे. त्यांच्या मनाप्रमाणे केला नाही. हा कायदा देशातील ८० टक्के शेतकऱ्यांसाठी जे पाच एकरच्याखाली आहेत त्यांच्या समृद्धीसाठी, गरीब शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हे कायदे आणले होते. मोदींचा शेती संदर्भातील ७ वर्षांचा इतिहास तपासून पाहा, २००९ रोजी ५९ हजार कोटी रुपये कर्जमाफी केली त्याचे अजून काँग्रेसकडून कौतुक केले जात आहे परंतु मोदींनी दरवर्षी पीएम किसान योजनेत ८० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटले आहेत असे प्रवीण दरेकर म्हणाले.

आजचा दिवस काळा – दरेकर

हा शेतकऱ्यांचा काळा दिवस आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद जोशी यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांसाठी पणाला लावले होते. त्यांनी असे म्हटलं होते की, शेतकऱ्यांच्या पायातील शृंकला बेड्या दलालांच्या काढा आणि शेतकऱ्याला बाजारत मुक्त व्यवहार करु द्या यामुळे मधले दलाल आणि खर्च सगळे जाईल आणि शेतकऱ्याला याचा आर्थिक फायदा होईल. हा कायदा रद्द केल्यामुळे शरद जोशी यांचा आत्मा अस्वस्थ झाला असेल असे अत्यंत चिंतेतून बोलत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.


हेही वाचा : farm laws: तीन कृषी कायदे रद्द, राकेश टिकैत ते राहुल गांधी कोण काय म्हणाले?