farm laws withdrawn: देशातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झुकवले, नवाब मलिकांची प्रतिक्रिया

farm laws withdrawn Nawab malik reaction on Pm Narendra modi announce 3 farm laws withdrawn
farm laws withdrawn: देशातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झुकवले, नवाब मलिकांची प्रतिक्रिया

देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुकवलं असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यावर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आंदोलनात फूट पाडण्यात आली. शेतकऱ्यांवर गाड्या चढवल्या त्यांना देशद्रोही संबोधण्यात आले पंरतु तरिही ते मागे हटले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा हा मोठा विजय असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यावर मलिक म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना कृषी क्षेत्रात काय कामगिरी केली आहे त्याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी यावेळे ३ कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.

वर्षभर या देशातील शेतकरी लढत होते. लोकांनी प्राणाची आहुती दिली. मंत्र्यांनी गाड्या चढवून त्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही असे संबोधण्यात आले. शेतकरी मागे हटले नाही ते दटून राहिले शेवटी त्यांना कायदा मागे घ्यावा लागला. मागील ७ वर्षांमध्ये कोणताच निर्णय मोदी सरकारने मागे घेतला नाही. आम्ही ज्या पद्धतीने देश चालवायचा आहे त्याचप्रमाणे करु पण शेतकरी लढत राहिले. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा विजय शेतकऱ्यांचा असल्याचे नवाब मलिक म्हणाले.


हेही वाचा : Farm Laws : तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा