farm laws: तीन कृषी कायदे रद्द, राकेश टिकैत ते राहुल गांधी कोण काय म्हणाले?

farm laws withdrawn rahul gandhi all party leaders comment on modi farm laws withdrawn decision
farm laws: तीन कृषी कायदे रद्द, कोणाची काय प्रतिक्रिया? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. देशातील शेतकऱ्यांनी या कृषी कायद्यांविरोधात मागील ११ महिन्यांपासून आंदोलन पुकारले होते. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. बळीराजापुढे केंद्र सरकार झुकले अशी प्रतिक्रिया सर्वच राजकीय नेत्यांकडून येत आहे. देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अंहकाराला झुकवले असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना देशातील तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी गुरुनानक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे कायदे आणले होते. अनेक तज्ञांशी चर्चा करण्यात आली परंतु हे कायदे आता आम्ही रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदींच्या निर्णयावर राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय नेत्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच आगामी निवडणुकांमुळे हा निर्णय मागे घेतला असल्याची टीका केली आहे.

राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करुन अहंकाराला झुकवले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना शुभेच्छा देत जय हिंद, जय हिंद का किसान असा नारा लगावला आहे.

आंदोलन मागे घेण्यात येणार नाही – राकेश टिकैत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेणार नाही असे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. “आंदोलन तत्काल वापस नहीं होगा, हम उस दिन का इंतजार करेंगे जब कृषि कानूनों को संसद में रद्द किया जाएगा । सरकार MSP के साथ-साथ किसानों के दूसरे मुद्दों पर भी बातचीत करें” आशा आशयाचे ट्विट राकेश टिकैत यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी जय हिंद अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया 

काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा गेल्या एक वर्षापासून ऊन, पाऊस आणि रक्त गोठवणाऱ्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय आहे.