घरमहाराष्ट्रनाशिकशेतकरी तरुणांचे विवाह होण्यासाठी शेतकरी अर्धांगिनी योजना

शेतकरी तरुणांचे विवाह होण्यासाठी शेतकरी अर्धांगिनी योजना

Subscribe

दरेवाडी सरपंच आनंदा दरगुडे यांची युक्ती : शेतकऱ्याच्या मुलाशी विवाह केल्यास मुलीला ५५५५ रूपये व संसारोपयोगी साहित्य भेट

राजु नरवडे । संगमनेर – गावातील शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाह व्हावे म्हणून संगमनेर तालुक्यातील दरेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी एक अनोखी युक्ती लढवली आहे. जी मुलगी गावातील शेतकऱ्याच्या मुलाशी विवाह करेल त्या मुलीस रोख रक्कम ५५५५ रूपये व संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात येणार असून शेतकरी अर्धांगिनी असे या योजनेचे नावही ठेवले आहे.

दरेवाडी गावची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार जवळपास १ हजार १२ असून त्यात मात्र आता वाढ झाली आहे. गावातील अनेक तरूण उच्चशिक्षित झाले आहे. मात्र नोकरीच्या पाठीमागे न जाता ते आज चांगल्या पद्धतीने शेती करत आहे. मात्र त्यांचे विवाहसुद्धा होत नाही, कारण मुलीकडचे पाहुणे म्हणतात की मुलगा काय करतो शेती करतो असे सांगितल्यावर कुणी मुलगीही देत नाही म्हणून आज जवळपास गावातील पन्नास ते पंच्चावन मुलांचे विवाह झालेले नाही, गावातील मुलांचे विवाह व्हावे म्हणून गावचे लोकनियुक्त सरपंच आनंदा दरगुडे यांनी एक युक्ती लढवली आहे. मुलांचे विवाह व्हावे म्हणून जी मुलगी दरेवाडी गावातील तरुणाशी विवाह करेल त्या मुलीला रोख रक्कम ५५५५ रूपये व संसारोपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरपंच आनंदा

- Advertisement -

दरगुडे यांनी शेतकरी अधागिनी असे नावही या योजनेला दिले आहे. विशेष बाब म्हणजे सरपंच यांनी स्वत्ता ही योजना सुरू केली असून तेच रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य देणार आहेत. यासाठी त्यांना उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यासर्वांचेही सहकार्य लाभले आहे. तर सरपंच आनंदा दरगुडे यांचेही सर्वांनी कौतुक केले आहे. तर शेतकरी अर्धांगिनी अशा पद्धतीची योजना रावणारे हे पहिले सरपंच असल्याचे काहींनी सांगितले आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे आपन म्हणतो मात्र शेतकन्यांच्या मुलांना मुली देण्यास का ? टाळाटाळ करतात त्यामुळे मी एक युक्ती ? लढवली शेतकरी अर्धांगिनी ही योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून दरेवाडी गावातील शेतकर्यांच्या मुलाबरोबर जी मुलगी विवाह करेल त्या मुलीस रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य भेट देणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाला थोडाफार तरी हातभार लागणार आहे.

- Advertisement -

– आनंदा दरगुडे (सरपंच दरेवाडी ता. संगमनेर)


दरेवाडी गावातील अनेक शेतकर्यांची मुल उच्चशिक्षित आहे. मात्र त्या ● मुलांचे विवाह झाले नाही. त्यामुळे मुलगी देताका हा प्रसंग आज गावावर ओढवला आहे. ज्यावेळेस कोरोना सारखा आजार आला त्यावेळी शहरातील लोक खेड्याकडे आली आणि त्याच खेड्यातील शेतकर्यांच्या मुलांना मुली देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे ही चुकीची बाब आहे. त्यामुळे शेतकयांच्या मुलांसाठी मनाचा मोठेपणा दाखवून शेतकर्यांच्या मुलांना मुली देणे गरजेचे आहे.

जनार्दन मैड (सामाजिक कार्यकर्ते दरेवाडी ता. संगमनेर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -