पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन स्थगित, कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निघाला सकारात्मक तोडगा

पुणतांब्यातील शेतकरी आंदोलनाला (Punatamba Farmers Agitation) अखेर स्थगित मिळाली आहे. कारण या संबंधीत प्रश्नांवर कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर एक सकारात्मक तोडगा निघाला आहे. शेतकऱ्यांनी विविध विभागांशी संबंधित मागण्या (Farmers Demand) केल्या आहेत. त्यामुळे येत्या ७ जून रोजी या सर्व विभागांशी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांशी मुंबईत बैठका घेणार असल्याचे आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे.

या बैठकीचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. त्यानंतर आता मंगळवारी यासंबंधीत बैठक घेतली जाणार असून पुढील निर्णय घेण्याच येणार असल्याचे डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले आहे.

कृषिमंत्र्यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा 

या आंदोलनाला शेतकऱ्यांनी १ जूनपासून सुरूवात केली होती. ५ जूनपर्यंत दररोज धरणं धरण्यात येणार होते. मात्र, आज चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पुणतांब्यात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेत प्रत्येक मागणीवर विचार करण्यात येणार आहे. या मागण्या सरकारमधील विविध विभागांशी संबंधित असल्यामुळे या विषयावर मुंबईत संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक ७ जूनला पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. यामुळे पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, आता हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून बैठकीनंतर पुढील निर्णय तातडीने घेण्यात येणार आहे.

या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक

या मागण्यांसंबंधी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, या मागण्यांसंबंधी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंबधीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. यावर सविस्तर चर्चा करून जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, ते लावले जातील. इतर प्रश्नांसाठी संबंधित यंत्रणा आणि केंद्र सरकारकडे पाठपुरवठा केला जाईल, असं कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या सभेला अटी-शर्थींसह पोलीसांची परवानगी