Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक! संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

दादा भुसेंकडून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक! संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Subscribe

मुंबई – राज्यातील सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर आगपाखड करत असतानाच एकमेकांचे भ्रष्टाचारही बाहेर काढत आहेत. आमदार राहुल कुल यांच्या दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि.चा कथित भ्रष्टाचार समोर आणल्यानंतर संजय राऊतांनी आता बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी काल यासंदर्भात ट्वीट केले आहे. दादा भुसे यांचा फोटो ट्वीट करत म्हणतात की, हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.

- Advertisement -


दरम्यान इतर माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार, दाभाडी येथे गिरणा चिनी कारखान्याला वाचवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी गिरणा बचाओ समितीच्या माध्यमातून गिरणी शुगर अॅण्ड एलाइड इंडस्ट्रीज लि.ची स्थापना केली होती. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांकडून त्यांनी लाखो रुपये गोळा केला. परंतु, कंपनीच्या संकेतस्थळावर केवळ ४७ मुख्य शेअरधारकांची नोंद आहे. यांच्याकडून १६ कोटी २१ लाख, ८ हजार ८०० रुपये शेअर्सची रक्कम एकत्र केली आहे. परंतु तरीही दादा भुसे गिरणी सहकारी चिनी मिलला वाचवू शकले नाही. उलट शेतकरी आणि शेअर्सधारकांची फसवणूक केली, याप्रकरणी दादा भुसेंविरोधात १ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादा भुसेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे. दादा भुसे हे महाविकास आघाडीच्या काळात कृषीमंत्री होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तेही शिंदे गटात सामील झाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद आणि बंदरे व खनिकर्म मंत्रीपद मिळालं. म्हणजेच, संजय राऊतांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -