घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकांदाप्रश्नी संतप्त शेतकर्‍यांचा केंद्रियमंत्र्यांना घेराव

कांदाप्रश्नी संतप्त शेतकर्‍यांचा केंद्रियमंत्र्यांना घेराव

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी रविवारी (दि. ५) केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार आल्या होत्या. त्यावेळी मंत्री डॉ. पवार व शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे ह्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून रोज कुठे ना कुठे आंदोलन केले जात आहे. या प्रश्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाफेडला भेट देऊन कांदा खरेदीबाबत आढावा घेतल्यानंतर त्यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांसोबत संवाद साधला.

यावेळी निफाडच्या शिरसगाव येथे कांदा भाव घसरणीबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री पवार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कांदा भाव घसरणीत राजकारण आणू नका. केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यातूनच केंद्र व राज्य सरकार विषयक असंतोष निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. निफाड दौर्‍यावर असलेल्या मंत्री डॉ. पवार यांनाही शेतकर्‍यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शेतकरी संघटनेने नाफेडच्या कांदा खरेदी वरून मंत्री डॉ. पवार यांना घेराव घातला यावेळी शेतकरी आणि मंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची ही झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याचे निर्माण झाला होता.

काहीकाळ तणाव

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेसह शेतकर्‍यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला. शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाफेड काहीच कामाचे नसल्याचे सांगताच केंद्रीय मंत्र्यांचा संताप अनावर झाला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू. या प्रश्नांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मंत्री डॉ. पवारांना काढता पाय घ्यावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -