नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना न भेटताच निघाले मुख्यमंत्री शिंदे अन् लगेच केला कॉल

नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला

farmers interacted with chief minister eknath shinde through video call in nanded

मुंबई : पावसाच्या अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक भागात पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उभं पिक वाहून गेलं आहे. तर अनेक भागात ओल्या दुष्काळामुळे पिकं सडून जात आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यंत्री शिंदेंना भेटण्यासाठी नांदेडमधील शेतकरी भर पावसात रस्त्याच्या बाजूला उभे होते. पण ऐनवेळी मुख्यमंत्र्याचे काही कार्यक्रम रद्द झाल्याने ते आलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांना न भेटताच शेतकरी रिकाम्या हाती घरी परतले. या गोष्टीची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित नाराज शेतकऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी सुरु होत्या, यामुळे भेटीगाठी आणि बैठकांमुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्याला उशीर झाला, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौराही रात्री उशीरापर्यंत सुरु होता. या दौऱ्यादरम्यान ते नांदेडमधील पुरग्रस्त भागाची देखील पाहणी कार्यक्रम करणार होते. मात्र रात्री उशीर झाल्याने त्यांच्या दौऱ्यातील अनेक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आले. मात्र मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येणार म्हणून अनेक शेतकरी भर पावसात त्यांची वाट पाहत होते. पण मुख्यमंत्री यांचा ताफा न थांबल्याने शेतकरी नाराज झाले. मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले मात्र त्यांनी पुरग्रस्तांच्या अडचणी नाजून न घेतल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी त्यांनी नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे गावातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहणी करता न आल्याने आणि शेतकऱ्यांची भेट घेण्याचे राहिल्याने मुख्यमंत्र्यांनी व्हि़डीओ कॉल करुन शेतकऱ्य़ांची चौकशी केली. यावेळी मुख्यमंत्री हे सरकार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे सरकार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देऊ असे आश्वासन दिले.


संजय राठोडांना पुन्हा मंत्री करणं दुर्दैवी, त्यांच्याविरोधात माझा लढा सुरुच राहिल ; चित्रा वाघ