घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांचं आंदोलन नौटंकी, गुलाबराव पाटलांची टीका

शेतकऱ्यांचं आंदोलन नौटंकी, गुलाबराव पाटलांची टीका

Subscribe

जळगाव – कापसाला हमीभाव मिळावा याकरता बुलढाण्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज केला. याप्रकरणी शेतकरी नेते रविकांत तुपकर आता उपोषणाला बसले आहेत. मात्र, या सर्व प्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र केलं आहे.

‘शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलनं केली. मात्र हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार होणं चुकीचं आहे. मात्र, हे आंदोलन नौटंकी आहे. हे मला पसंत नाही. आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. अतिरेक करणं चुकीचं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

- Advertisement -

जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील गेले होते. यावेळी अनावधानाने ते एकनाथ शिंदे यांची जयंती असा उल्लेख त्यांच्या तोंडून आला. मात्र, आपली चुकी लक्षात येताच चूक सुधारली. रमाई यांच्या जयंतीनिमित्त असं बोलताना एकनाथ शिंदे यांच्या जयंतीनिमित्त, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यानंतर लगेच त्यांनी चूक सुधारली आणि वाढदिवसानिमित्ताने, असा उल्लेख त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -