मुंबई : एमएसपीच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहे. या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवले आहे. भाजपा सरकारचे प्रत्येक धोरण हे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकावर हल्लाबोल केला आहे. ज्यावेळी कांद्याची निर्यात होणे आवश्यक होते. तेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि गरज नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “केंद्रातील भाजपा आणि राज्यातील महायुतीचे सरकार पाहिले तर, यांचे शेतकऱ्याबाबत काय धोरण आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर, शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले आणि त्यांच्या आयुष्यात आनंद मिळेल आणि शेतकरी चांगली प्रगती होईल. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे त्याचे भाव कमी झाले. इथेनॉलवर बंदी आणली. यामुळे साखर 150 रुपयाने कमी झाली आहे. ग्राहकांचा विचार करण्यात आमची कोणतीही हरकत नाही. पण ज्यांनी पिकविले, कष्ट आणि श्रम केला त्याचा देखील विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या खिशातून काढायचे हे सरकारचे धोरण बरे नाही. तो भार सरकारने घेतला पाहिजे होता. कांद्याची निर्यात बंदी उठवली, ज्यावेळी कांद्याची निर्यात होणे आवश्यक होते. तेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लावली आणि गरज नसताना कांद्यावरची निर्यात बंदी उठवली. भाजपाचे प्रत्येक धोरण हे शेतकऱ्यांविरोधात आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन जरी दिल्लीत सुरू असले तरी, देशभरात शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे.”
हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशावर शरद पवार म्हणतात, “हा श्वेतपत्रिकेचा इम्पॅक्ट”
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाद्दल बाळासाहेब थोरात म्हणाले, “जागावाटपाबाबत एकमत नाही, असे नाही आमची चर्चा सुरू आहे. उमेदवार ठरविण्याबाबत प्रक्रिया सुरू होईल. सतेज पाटील हे कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी मिळावी, यासाठी आग्रही आहेत”, असे सचूक विधान बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.