Nashik Mumbai Long March : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शेतकऱ्यांचे लाल वादळ पुन्हा मुंबईत धडकणार

मागील अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे. दिंडोरी मधून हा लॉन्ग मार्च निघाला. विशेष म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. (Farmers Protest Nashik Mumbai Long March starts from dindori nashik)

आपल्या विविध मागण्यासाठी शेतकरी आंदोलन करत असून, आदिवासींच्या वनजमिनींच्या प्रश्नासंदर्भात माकप आक्रमक झाले आहे. परिणामी नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. काहीवेळातच हा लॉन्ग मार्च नाशिक शहरात दाखल होणार आहे.

या लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे. यावेळी माजी आमदार जेपी गावित म्हणाले कि, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, कांद्याचे भाव गेले, द्राक्ष बाग देखील खराब झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनचे पण भाव देखील कोलमडले आहेत. शेतकरी वर्ग वैतागलेला असून सरकार याबाबत दखल घेत नाही.

सरकारी कार्यालयात आता कंत्राटी भरती केली जात आहे. त्यामुळे सरकारची भूमिका हळूहळू बदलायला लागलेली आहे. म्हणून आमचा मोर्चा काढला असून महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मोर्चा आहे, असे गावित म्हणाले.

या मोर्चाच्या माध्यमातून वन जमिनीचा प्रश्न आहे, शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी, सातबारा कोरा करावा, अशी मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा विषय आहे. सोयाबीन कांद्यासह सर्व शेतीमालांना भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर आदिवासींना वन जमिनी मिळाव्यात या मुख्य मागणीसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे.