Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNana Patole : भाजपा सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार! पटोलेंचा इशारा

Nana Patole : भाजपा सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार! पटोलेंचा इशारा

Subscribe

मुंबई : शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. पण, शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीपणा वाटतो, अशी टीका करत गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून शेती साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा सरकारला शेतकरीच सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  आज (21 फेब्रुवारी) दिला. (Farmers will pull BJP government down from power Nana Patoles warning)

हेही वाचा – Maharashtra Politics : अजित पवार गटाला धक्का; सुनील तटकरेंचे मोठे बंधू शरद पवार गटात

- Advertisement -

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने देशभर आंदोलने केली. खासदार राहुल गांधी यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आता केलेल्या मागण्यांनाही काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगत काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला तर हमी भावाचा कायदा करणार, अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी जाहीरपणे दिली  आहे, असे पटोले म्हणाले.

आधारभूत किंमत लागू करण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jarange VS Baraskar : बारसकरांच्या आरोपांवर जरांगे म्हणतात, ‘सरकारने माझ्याविरुद्ध सापळा रचला’

काळया यादीतील कंपनीलाच पुन्हा रुग्णवाहिकेचे कंत्राट

रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या बीव्हीजी कंपनीला देशभरातील सात राज्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. या कंपनीला काम देऊ नये, असे आदेश आहेत. या कंपनीकडे जुन्या आणि कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका असून कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती. त्यानंतर नवीन निविदा काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते. परंतु महायुती सरकारने पुन्हा बीव्हीजी याच कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यामुळे या कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल करत काळ्या यादीतील कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -