घर महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; एक ठार, 19 जखमी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; एक ठार, 19 जखमी

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. एसटी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. माणगावजवळच्या रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला आहे. यात एक जण ठार तर 19 जण जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. एसटी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. माणगावजवळच्या रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला आहे. यात एक जण ठार तर 19 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी निघाले होते. ही बस मुंबईहून राजापूरकडे निघाली होती. (Fatal accident of bus going to Konkan for Ganeshotsav Mumbai Goa Express Way One killed some injured pup)

एसटी बस ही मुंबई राजापूरकडे जाणारी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

बोरघाटात ट्रॅफिक जॅम

- Advertisement -

शनिवारी आणि रविवारी सलग सुट्ट्या आणि अवघ्या एका दिवसावर आलेला गणेश उत्सव यासाठी अनेक मुंबईकर नागरिक आपल्या गावी गणपती बसवण्यासाठी येत असतात. एक्स्प्रेसवर नेहमीच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते. कालही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. लांबच्या लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, आज सकाळच्या सुमारास लोणावळ्याजवळ असणाऱ्या बोरघाट परिसरात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू असून चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठी संख्या रस्त्यावर पाहायला मिळत आहे.

कोकणात जाणाऱ्या रेल्वे 6 तास उशिरानं

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या 6 तास उशिरानं धावत असल्यामुळे कोकणवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 12 तासांच्या प्रवासासाठी कोकणाची वाट धरलेल्या चाकरमान्यांना तब्बल 18 तास लागत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यातील चाकरमानी प्रवाशांची अक्षरश: झुंबड उडाल्याचं चित्र पहायला मिळालं. या गर्दीमुळे काही प्रवाशांची ट्रेनही चुकली. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

(हेही वाचा: Irshalwadi : बेपत्ता 57 व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देणार; मदत आणि पुनर्वसनमंत्र्यांनी दिली माहिती )

- Advertisment -