घरमहाराष्ट्रमुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Subscribe

डहाणू – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबई दिशेने जाणाऱ्या ब्रिझा कारचा समोरून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कारमधील चार प्रवाशांपैकी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये दीपक अग्रवाल (58), सुमित्रा अग्रवाल (78), सत्यनारायण अग्रवाल (80) अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, केतन अग्रवाल वय अंदाजे 25 हा बचावला आहे.

हेही वाचा – नवले पुलावरील दुर्घटनांचे सत्र थांबेनाच; आज पहाटेच्या अपघातात चार जण जखमी

- Advertisement -

मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ब्रीझा कार चालकाला समोरून चाललेल्या ट्रकच्या वेगाचा अंदाज आला नाही. त्यामुळे  कार चालकाने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, काही वेळातच यातील दोन जखमींचा मृत्यू झाला. तर एका रुग्णाला धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – शहरात सर्वाधिक ११६ अपघात रात्री ८ ते १२ दरम्यान; सर्वात कमी ३५ मध्यरात्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -