घर महाराष्ट्र पुणे पुणे-सोलापूर हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर हायवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Subscribe

पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात तीन वेगवेगळ्या वाहनांचा विचित्र अपघात घडलाय.

पुणे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात तीन वेगवेगळ्या वाहनांचा विचित्र अपघात घडलाय. यामध्ये एका कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला आणि त्यानंतर दुसऱ्या दिशेने उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीला धडक दिली. यातील कंटेनर इतका भरधाव वेगात होता यामुळे रस्त्यावरील दुभाजक तोडून थेट दुसऱ्या दिशेच्या रस्त्यावर धडकला.

शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत हा विचित्र अपघात घडलाय. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर हा पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी एलाईट चौक आणि तळवडी चौक या दोन्ही चौकांच्यामध्ये हा कंटेनर आला असताना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एका कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढचा कंटेनर थेट दुभाजकावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कोसळला. हा अपघात फक्त इथवरंच नव्हता. धडकेने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर कोसळलेल्या कंटेनरने आणखी एका चारचाकी गाडीला धडक दिली. ही चारचाकी सोलापूरच्या दिशेने जात होती.

- Advertisement -

हा अपघात इतका भयंकर होता की यात चारचाकी गाडीचे व कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. जखमींना तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच मिनिटाच्या अंतरावर लोणी काळभोर पोलीस ठाणे अंतर्गत उरुळी कांचन पोलीस दुरक्षेत्र असून तरीही पोलीस आले नसल्याने तब्बल अर्धा तास या अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी वाहने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -