Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वडील, भावानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

वडील, भावानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

अमरावतीमध्ये वडिल, भाऊ आणि मावशीच्या नवऱ्यानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोजच्या रोज समोर येणाऱ्या गुन्हेगारी घटनांमधून मानवतेला काळिमा फासणाऱ्या वृत्तीच्या नवनवीन पातळी समोर येत आहेत. अमरावतीमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतून मानवी क्रूरतेनं अधिक निचांकी पातळी गाठल्याचं समोर आलं आहे. सख्ख्या बापाने, सख्ख्या भावाने आणि काकाने एका अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा संतापनजन प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी इतर कुणाकडूनही मदत न मिळाल्यामुळे अखेर पीडितेने स्वत: पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमरावती पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काकाकडूनही मुलीचा अपेक्षाभंगच

१७ वर्षांच्या या पीडितेच्या आईचं दोनच वर्षांपूर्वी कर्करोगामुळे निधन झालं. नवऱ्याच्या हाती आपली लेक सोपवून त्या माऊलीनं जगाचा निरोप घेतला. पण तोच बाप वासनांध झाला आणि पोटच्या पोरीवरच त्यानं हात टाकला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या बापानं अनेकदा आपल्या मुलीवर बलात्कार केला. बापाचं हे भीषण रुप मुलीसाठी भीषण धक्का देणारं होतं. त्याविरोधात पीडितेने दुसऱ्या गावात राहाणाऱ्या आपल्या मावशीकडे मदत मागितली. मावशीने तिला राहायला बोलावलं. तिकडे गेल्यानंतर मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच पीडितेच्या काकाने देखील तिच्यावर वाईट नजर टाकली आणि बलात्कार केला. त्यामुळे पीडिता अधिकच कोलमडली. मावशीला सांगून देखील मावशीने मदत केली नाही. उलट आसपास मुलीच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी अफवा पसरवली. त्यामुळे पीडिता जेव्हा आसपासच्या लोकांकडे मदत मागायला गेली, तेव्हा त्यांनी देखील तिला मदत केली नाही.

सख्खा भाऊही झाला नराधम

- Advertisement -

अखेर शेवटचा पर्याय म्हणून पीडिता पुन्हा आपल्या घरी परतली. तिथे मोठ्या भावाकडे तिने मदत मागितली. पण सख्ख्या भावाने देखील तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पीडिता पुरती कोलमडली. अखेर २६ जानेवारी रोजी तिने पोलीसांकडे जाऊन महिला पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करून आपली कहाणी सांगितली. पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे.


हेही वाचा – जोगेश्वरी येथे 23 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -