घरठाणेनात्याला काळिमा! ५० रुपये चोरले म्हणून पित्याकडून मुलाची निर्घृण हत्या

नात्याला काळिमा! ५० रुपये चोरले म्हणून पित्याकडून मुलाची निर्घृण हत्या

Subscribe

कळव्यात पोटच्या बाळाच्या आईनेच हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता ५० रुपये चोरल्याच्या कारणावरून पित्याने दहा वर्षीय मुलाला बेशुद्ध होईपर्यंत केलेल्या मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कळव्यात समोर आली आहे. ही घटना बुधवारी रात्री वाघोबा नगर येथे घडल्याने कळवा पुन्हा एकदा हदरले आहे. या मारहाणीत मृत मुलाच्या डोक्याची कवटी फुटेपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी त्या पित्याला अटक केली आहे.

संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे अटक केलेल्या पित्याचे नाव असून तो पत्नी आणि दोन मुलांसह कळवा वाघोबानगर, ठाकुरपाडा झोपडपट्टी येथे राहत आहे. मयत करण या मुलाने बुधवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी घरातून ५० रुपये चोरले होते. या गोष्टीचा राग मनात धरून संदीप याने मुलगा करण याला बुधवारी रात्रीच्या सुमारास बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. त्याच्यानंतर त्या पित्याने मुलाला घरातच चादरीत गुंडाळून घराचा दरवाजा बंद ठेवला. या घटनेची खबर दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांनी कळवा पोलिसांना दिली.

- Advertisement -

१२ तासाहून अधिक काळ मुलगा घरात बेशुद्ध अवस्थेत बंद असल्याची खबर मिळताच कळवा पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता घरात दहा वर्षीय मुलाला एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्वरित त्या मुलाला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले.मयत मुलाच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून या मारहाणीत मयताच्या डोक्याची कवटी देखील फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

तसेच पोलिसांनी मयत मुलाच्या बहिणीकडे विचारपूस केली असता,तिने भावाने घरातून ५० रुपये चोरले होते,त्यावरून पप्पानी त्याला मारहाण केल्याचे सांगितले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत त्या पित्याला गुरुवारी अटक केल्याची पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद, जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -