Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच केला अत्याचार

गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर पित्यानेच केला अत्याचार

Subscribe

 

नागपूरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर सावत्र पित्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फडणवीस हे गृहमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याच शहरात मुली असुरक्षित असल्याचा आरोप होत आहे.

- Advertisement -

पीडित मुलीच्या आईने पोलिसांत याची तक्रार केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. धीरज तायडे असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीची आई आणि धीरजची सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्या दोघांना विवाह केला. घरात कोणी नसताना आरोपीने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. पीडितेने आईला ही बाब सांगितली नाही. पण घटनेच्या दिवशी पीडितेच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे महिलेला संशय आला. महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यामुळे महिलेला धक्का बसला.

महिलेने नागपूर पोलिसांत याची तक्रार केली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. पोलीस याचा अधिक तपास करत आहे. विवाह केल्यानंतर हे जोडपे मुंबईत राहायला होते. मुंबईतही आरोपीने पीडितेवर अत्याचार केला होता. तसेच त्याने मुलीला धमकावले होते. कोणालाही याबाबत सांगितलेस तर तुझ्या आईला आणि भावाला ठार मारेन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. मात्र शुक्रवारी आरोपीने पीडितेवर पुन्हा अत्याचार केला असल्याची बाब तपासात समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी खेड सत्र न्यायालयाने एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.  खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 19 जुलै 2018 रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. 20 जुलै रोजी अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका नागरिकाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलीस निरिक्षक अनिल गंभीर व सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण ( वय 29) याला ताब्यात घेतलं. सुर्यकांतचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

 

- Advertisment -