घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये महिलेसह तिच्या मुलीला बाप-लेकाची मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलेसह तिच्या मुलीला बाप-लेकाची मारहाण

Subscribe

याप्रकरणी आशा गणपत गोरे (वय-४०) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून बाप-लेकाने एका महिलेला आणि तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत. बबलू आबा गायकवाड, आबा गोपीनाथ गायकवाड दोघेही (रा.भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकाची नावं आहेत. याप्रकरणी आशा गणपत गोरे (वय-४०) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा – अखेर मुलींसाठी सैनिक स्कूलची दारं उघडली

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी आबा हा फिर्यादी आशा यांचा मेहुणा आहे. मंगळवारी आरोपी आबा आणि आशा हे बोलत थांबले होते. तेव्हा, तिथे बबलू आला तू माझ्या वडिलांबरोबर का बोलतेस? असं त्याने फिर्यादी आशा यांना विचारले. त्यानंतर हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण केली. फिर्यादी यांची मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपी बबलू आणि आबा या दोघांनी मिळून तिला देखील मारहाण केली. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -