घरमहाराष्ट्रएफडीएने जप्त केली ४० लाखांची औषध

एफडीएने जप्त केली ४० लाखांची औषध

Subscribe

सरंक्षण दलाच्या जवानांची औषधे खुल्या बाजारात विक्रीला येत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील धाडसत्र कारवाईतून ४० लाख किंमतीचा औषधसाठा जप्त केला आहे.

संरक्षण दलाच्या जवानांची औषधे खुल्या बाजारात विक्रीला येत असल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली असतानाच राज्य कामगार विमा योजना, शासकीय रुग्णालयांसारख्या सरकारी संस्थांमधील रुग्णांसाठी असलेली औषधांची विक्री देखील खुल्या बाजारात होत असल्याची माहिती बुधवारी एफडीए विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातील धाडसत्र कारवाईतून ४० लाख किंमतीचा औषधसाठा जप्त केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतात निर्माण होत नसलेली बाहेरगावाहून आयात केलेली औषधे या कारवाईत आढळून आली.

या औषधांची होत होती विक्री

गल्वुस ५०, अॅक्रेलीन, लॅनफोस सोलो स्टार इंजेक्शन, असा १३ लाख किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तर, मेडलाईफ एंटरप्रायझेस तळोजा इथून १७ लाखांचा औषध साठा जप्त केला. निवान फर्मास्युटीकल्स भायखळा, सेफ लाईफ इंटरप्रायझेस मुलुड सीके एजन्सी डोंगरी, निवान फर्मास्युटीकल्सला सानपाडा येथून समर्थ डिस्ट्रिब्युटर्सने पुरवठा देखील केल्याचे समोर आले. या कारवाईत आतापर्यंत एकूण पाच जणाविरोंधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचेही एफडीएकडून सांगण्यात आले. याशिवाय, दिल्ली, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यात तपास सुरु असून इतरही राज्यखतील तपासही सुरु असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -