Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी गर्भपात औषधाच्या बेकायदा विक्री प्रकरणी ११ जणांना अटक

गर्भपात औषधाच्या बेकायदा विक्री प्रकरणी ११ जणांना अटक

राज्यभरात १४ गुन्हे दाखल

Related Story

- Advertisement -

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी  अन्न आणि औषध प्रशासनाने १४ गुन्हे दाखल केले असून ११ व्यक्तींना अटक केल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी तथा  सहआयुक्त  दा. रा गहाणे यांनी मंगळवारी दिली.

राज्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची बेकायदा विक्री होत असल्याची शक्यता गृहीत धरून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने  या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर  २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी  तसेच धाडीची  मोहीम राबवून एकूण  ३४८ ठिकाणी तपासणी केली. या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे  अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले, चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४७ हजार ३७८ रुपये  किंमतीची औषधे जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याचे गहाणे यांनी सांगितले.

- Advertisement -

अशा प्रकारच्या एकूण १३ किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात  मुंबई, ठाणे,  पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील  पश्चिम उपनगरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध त्यानी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

- Advertisement -