घरठाणेकबुतरांना दाणे खाऊ घालताय..? तर थांबा, त्याआधी ही बातमी वाचा...

कबुतरांना दाणे खाऊ घालताय..? तर थांबा, त्याआधी ही बातमी वाचा…

Subscribe

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्राण्यांना आणि पक्ष्यांना खायला घालायला खूप आवडते. पण आता पक्षांमध्ये कबुतरांना खायला घालणे काही लोकांना अडचणीत टाकू शकते. कारण कबुतरांना खायला घालणाऱ्या लोकांना दंड आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.

बऱ्याच शहरात अशा अनेक जागा आहेत, जिथे कबुतरांसाठी मोठमोठे कबुतरखाने तयार करण्यात आले आहेत. या कबुतरखान्यांमध्ये अनेक रोज लोकं येऊन कबुतरांना दाणे खायला घालतात. पण आता कबुतरांना दाणे खायला घालण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कारण कबुतरांमुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या आजारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्याविरोधात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांत कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आजार पसरत असल्याने ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता याबाबत कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेने कबुतरांना दाणे खाऊ घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकाराला जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता कबुतरांना दाणे खायला घालण्यावर बंदी आली आहे. गेल्या काही दिवसात न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांनी देखील या आजारांना कबुतर जबाबदार असल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

जे लोक कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांच्या आसपास राहतात आणि त्यांच्या थेट संपर्कात येतात त्यांना या आजाराचा धोका अधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. पिसे आणि विष्ठेद्वारे पसरणारे जीवाणू श्वासाद्वारे फुफ्फुसात पोहोचतात. यानंतर, हे प्रतिजन शरीरात एक रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करतात, ज्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. यामुळे फुफ्फुसांना खूप नुकसान होते, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिसंवेदनशील न्यूमोनिटिसची लक्षणे तीव्र किंवा जुनाट असू शकतात. या ऍलर्जीच्या संपर्कात आल्यानंतर काही तासांत तीव्र लक्षणे दिसू शकतात आणि काही तास किंवा दिवस ही लक्षणे तशीच राहतात. उलटपक्षी, तीव्र लक्षणे हळूहळू विकसित होऊ शकतात आणि कालांतराने याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात, तिघांना सुखरूप वाचवले

दरम्यान, गेल्या काही दिवसांत ठाण्यासह, मुंबई आणि पुणे येथे देखील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे महानगरपालिकेकडून देखील कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी येऊ शकते, असे बोलले जात आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिकेने पोस्टर्स लावत ठाणेकरांना याबाबतचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -