घरक्राइमसंतापजनक! पुण्यातील कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरचा विनयभंग

संतापजनक! पुण्यातील कोविड रुग्णालयात महिला डॉक्टरचा विनयभंग

Subscribe

पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जम्बो कोविड रुग्णालयात एका महिला डॉक्टरचा तिथल्या दोन डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा घटना घडली आहे. महिला डॉक्टरने आरोप करत दोन्ही डॉक्टरांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश भद्रा व अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत.

या डॉक्टरांची एका खासगी एजन्सीमार्फत जम्बो हॉस्पिटलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही डॉक्टर्स पीडित महिला डॉक्टरला उद्देशून अश्लील टीपणी करत होते. महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, हा त्रास दिवसागणिक वाढत गेला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिला डॉक्टरने दोघांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत दोन्ही डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेले काही दिवस जम्बो कोविड रुग्णालय चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जम्बो कोविड सेंटरमधून ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. प्रिया गायकवाड यांना ५ तारखेलाच जम्बो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पण तिच्या डिस्चार्जबाबत नातेवाईकांना कोणतीच माहिती नसल्याने ही महिला घरचा रस्ता शोधत चुकून पिरंगुटकडे चालत गेली. यामुळे कित्येक दिवस ती बाहेरच राहत होती. यानंतर समाज माध्यमांतून प्रशासनावर, रुग्णालयावर चौफेर टीका झाली. दरम्यान, ही महिला शनिवारी पिरंगुटच्या घाटात सापडली. या घटनेमुळे जम्बो हॉस्पिटलची नाहक बदनामी झाल्याची खंत पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जम्बो हॉस्पिटलकडून व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यानेच आमचा रुग्ण बेपत्ता झाला होता, असा आरोप नातेवाईकांकडून होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -