Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र ताडोबा बफर क्षेत्रात वाघिणीचा मृत्यू

ताडोबा बफर क्षेत्रात वाघिणीचा मृत्यू

शरीरातील अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती

Related Story

- Advertisement -

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणार्‍या डोणी नियतक्षेत्र येथे विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचार्‍यांना वाघीण मृत अवस्थेत आढळली.

ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर हल्ला करणारी हीच वाघीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्राथमिक तपासणीनुसार, या वाघिणीचा मृत्यू शरीरातील अंतर्गत जखमांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही वाघीण २ जून रोजी दुपारी डोणी एकचे वनरक्षक यांना नियमित गस्तीमध्ये दाट जंगलात बसून असल्याचे दिसून आले होते. ही वाघीण उभी होत नसल्याने तिचे सलग तीन दिवस विशेष निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर आज ती थेट मृतावस्थेतच आढळली.

- Advertisement -