घर महाराष्ट्र HSC Result : 12वी बोर्डाच्या निकालाला काही तास बाकी, असा पाहा रिझल्ट

HSC Result : 12वी बोर्डाच्या निकालाला काही तास बाकी, असा पाहा रिझल्ट

Subscribe

आज बहुप्रतिक्षीत असा बारावीचा निकाल दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असताना काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच बारावीच्या परिक्षा सुरू असतानाच काही पेपरफुटीच्या देखील घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा बारावी बोर्डाचा निकाल वेळेत लागेल की नाही, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण आज बहुप्रतिक्षीत असा बारावीचा निकाल दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

‘या’ संकेतस्थळावर पाहा निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळांवरून म्हणजेच वेबसाईटवरून पाहता येणार आहे. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.inhttp://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही विद्यार्थी आणि पालक निकाल पाहू शकतात.

- Advertisement -

05 जूनला महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. पण त्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतिक्षा होती ती निकालाची. निकालाची तारीख उद्याची असल्याने उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बारावी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मागील आठवड्यात बारावीच्या बोर्डाच्या निकाल हा 31 मेला आणि दहावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली होती. तसेच, बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

- Advertisement -

निकालाबाबत आक्षेप असेल तर असा करा अर्ज
आज निकाल हाती आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या निकालाबाबत आक्षेप आहे, अशा विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी/गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र मंडळाची अधिकृत वेबसाईट असलेल्या http://verification.mh- hsc.ac.in येथे स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार 26 मे ते सोमवार 5 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.


हेही वाचा –

- Advertisment -