जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यादरम्यान आंदोलस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि याप्रकरणी राज्यात अनेक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा निघत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला असतानाच आता राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांचा क्षेत्रपाहणी दौरा करणार आहेत. ज्यात महाराष्ट्र राज्य मागावसर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. निलिमा सरप (लखाडे) आणि प्रा. डॉ. गोविंद काळे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजासाठी 10 ते 12 सप्टेंबर, 2023 या कालावधीत औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांतील विविध जातींच्या संदर्भात क्षेत्रपाहणी करणार आहेत. (Field visit of members of State Backward Classes Commission to Aurangabad beed district )
दौऱ्याची रुपरेषा
रविवार 10 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6:00 वा खासगी वाहनाने बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
सोमवार 11 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वा. बीडहून माजलगावकडे रवाना. 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह माजलगाव येथे आगमन.
सकाळी 11.00 वाजता माजलगाव येथील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी ( जायकोची वाडी, धर्मेवाडी) दुपारी 1.00 वाजता मालगावहून गेवराई, जिल्हा बीडकडे रवाना.
दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, गेवराई, जिल्हा बीड येथे आगमन व भोजन. दुपारी 3.00 ते 4.00 विविध जातसमुहाच्या प्रतिनिधी तसंच संघटनांशी चर्चा व निवेदनं स्वीकरणं.
तसंच, 4.00 ते 5.00 वाजता गेवराई, जि. बीड येथील वायदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी
सायंकाळी 6.30 वाजता गेवराई, जि. बीड येथून पैठण, जि. औरंगाबादकडे रवाना. 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह पैठण, जि. औरंगाबाद येथे आगमन व मुक्काम.
तसंच, मंगळवार, 12 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 ते 10.30 तहसिल कार्यालय, पैठण येथे वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा.
दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 12 ते 1 वाजता विविध जातसमुहांच्या प्रतिनिधी तसंच संघटनांशी चर्चा व निवेदनं स्वीकारणं.
दुपारी 1 ते 2 या वेळेत राखीव. 2.30 ते 3.30 वाजता. औरंगाबादमधील वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक व चर्चा.
सायंकाळी 4 ते 6 वाजता बैठका.
(हेही वाचा: भ्रष्टाचारी लोकसेवकांचे ९ पासून फोटो प्रदर्शन; महाराष्ट्र निर्भय पार्टीचा उपक्रम )