घरताज्या घडामोडीभारतीय नौदलात दाखल होणार 'आयएनएस वागीर'; कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी

भारतीय नौदलात दाखल होणार ‘आयएनएस वागीर’; कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी

Subscribe

भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल होणार आहे. आयएनएस वागीर असे या पाणबुडीचे नाव आहे. आज ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होत आहे. ही पाणबुडी भारतीय बनावटीची असून, माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली 'आयएनएस वागीर' ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे.

भारतीय नौदलात नवीन पाणबुडी दाखल होणार आहे. आयएनएस वागीर असे या पाणबुडीचे नाव आहे. आज ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होत आहे. ही पाणबुडी भारतीय बनावटीची असून, माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली ‘आयएनएस वागीर’ ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे. सायलेंट किल्लर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट-75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशी या पाणबुडीची ओळख आहे. (fifth scorpene class submarine ins vagir to be commissioned on january)

‘आयएनएस वागीर’ या पाणबुडीची मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने निर्मिती केली आहे. सोमवारी ‘आयएनएस वागीर’ नौदलात सामील होणार असून या कार्यक्रमासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे.

- Advertisement -

भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील चार पाणबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत.

पाणबुडीचे वैशिष्ट्ये :

- Advertisement -
  • भारतीय नौदलात सामील होणारी ‘आयएनएस वागीर’ पाणबुडी एक आधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे.
  • आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे.
  • ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते.
  • ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
  • शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही.
  • त्यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत.
  • ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे.
  • ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करु शकते.
  • ही पाणबुडी शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही.

‘प्रोजेक्ट 75, यार्ड 11879 अंतर्गत भारतीय नौदलाच्या पाचव्या कलावरी श्रेणीतील पाणबुडीने 1 फेब्रुवारीपासून सागरी चाचण्या सुरु केल्या. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून नोव्हेंबर 2020 मध्ये पाणबुडीचे बांधकाम सुरु करण्यात आले. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही पाणबुडी नौदलात सामील केली जाईल’, असे नौदलाने एका निवेदनात सांगितले.


हेही वाचा – उत्तर भारतातील ‘या’ राज्यांमध्ये थंडी आणि मुसळधार पावसाचा IMDचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -