घरमहाराष्ट्रवनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी

Subscribe

बीडच्या पूजा चव्हाणची आत्महत्या प्रकरण,भाजप आक्रमक, सखोल चौकशीची मागणी

चार दिवसांपूर्वी पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिने पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजपकडून पहिल्यांदाच राज्याचे वने आणि आपत्ती निवारण मंत्री संजय राठोड यांचे थेटपणे नाव घेण्यात आले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी एक व्हीडिओ ट्विट केला. संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असे मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकले. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या कुटुंबावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येणार्‍या बातम्या, सोशल मीडियातून येणार्‍या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

- Advertisement -

भाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणे, घोषणा करणे सोपे असते. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचे आहे, कसली वाट बघताय? एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय? ताबडतोब कारवाई करा, असे चित्रा वाघ म्हणाल्या. दरम्यान चौकशी पूर्ण होण्याच्या आधी काही लोक आरोप करतात. त्याला काही अर्थ नाही, असेही अजित पवार म्हणाले. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यावेळेस त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडले होते का?, असे बरेच काही त्याच्यातून प्रश्न निर्माण होऊ शकतात. धनंजय मुंडेंचे प्रकरण आता मिटले आहे. पण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

सखोल चौकशी करा
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्रातून केली आहे.

- Advertisement -

चौकशीनंतर सत्य समोर येईल
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असेही म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. धनंजय मुंडेंवर ज्यांनी आरोप केला. त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझे स्टेटमेंट करतेय, असे सांगितले. एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीचे आरोप करतो. मग त्याही खोलात गेलं पाहिजे, असा टोलाही पवार यांनी विरोधकांना लगावलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -