Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप कापला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप कापला, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उशीराने समोर आला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

उल्हानगरमध्ये कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणारा पाईप अज्ञात व्यक्तीने कापला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या रुग्णालयातील ऑक्सिजन वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण नसल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४ मधील महापालिका कोविड रुग्णालायत हा धक्कादायक प्रसा समोर आला आहे. ही घटना १७ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून रुग्णालयाचे नुकसान देखील झाले आहे. ऑक्सिजन पाईक कापल्याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उल्हासनगरमधील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊन या रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. या कोविड रुग्णालयात ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे सध्या ४ ते ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वॉर्डमध्ये कोरोना रुग्ण नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणारा पाईप कापला होता. रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या वॉर्डला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता. परंतू या वॉर्डमध्ये रुग्ण नसल्यामुळे मोठी जिवितहानी टळली आहे. मात्र रुग्णायाचे मोठं नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उशीराने समोर आला असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयातील कर्मचारी जितेंद्र माळवे यांनी केलेल्या तक्रारीवरुन विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -