घरमहाराष्ट्रया तारखेपासून भरा दहावीच्या परीक्षेचे अर्ज

या तारखेपासून भरा दहावीच्या परीक्षेचे अर्ज

Subscribe

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज २३ डिसेंबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज २३ डिसेंबरपासून भरण्यास सुरुवात होणार आहे. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

राज्यात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. तसेच वेळोवेळी कालावधी वाढवल्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणापत्र परीक्षा मार्च २०२० परीक्षांचे निकाल जुलै २०२० मध्ये जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ घेण्यात येणार्‍या दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून २३ डिसेंबर २०२० पासून ११ जानेवारी २०२१ पर्यंत भरायची आहेत. तर पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी,श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी १२ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना शाळांच्या लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. दहावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांमार्फत अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

नव्याने फॉर्म १७ भरणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक

नव्याने फॉर्म क्रमांक १७ द्वारे नोंदणी करणार्‍या खासगी विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपर्ण निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज भरण्याच्या तारखा

  • नियमित विद्यार्थी : २३ डिसेबर २०२० ते ११ जानेवारी २०२१
  • पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी : १२ ते २५ जानेवारी २०२१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -