घरमहाराष्ट्रमामाच्या मुलीशी लग्न करण्यावर सख्ख्या भावांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर सख्ख्या भावांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी

Subscribe

गणेशने रागाच्या भरात बाळूच्या डोक्यात घरातील काचेची बाटली मारली. यामध्ये बाळू जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

अहमदनगरमध्ये मामाच्या मुलीवरून दोघा सख्या भावांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली असून तो यामध्ये जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामाच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे. तुझे लग्न झाले असून, तू मुलीला का फितवतो असा सवाल बाळूने त्याचा भाऊ गणेशला केला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. त्या दरम्यान गणेशने रागाच्या भरात बाळूच्या डोक्यात घरातील काचेची बाटली मारली. यामध्ये बाळू जखमी झाला. ‘मी मामाच्या मुलीसोबत दुसरे लग्न करणार आहे,’ अशी धमकी देत आरोपी तिथून निघून गेला.

- Advertisement -

हाणामारीत जखमी झालेल्या बाळू कांबळेने थेट तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत गणेशच्याविरोधात तक्रार दाखल केली. बाळूवर सध्या उपचार सुरु आहेत. बाळूच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी गणेश कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मारहाण करणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -