घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखेर! भाजपाच्या अद्वय हिरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

अखेर! भाजपाच्या अद्वय हिरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

Subscribe

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्याने अनेक ठिकाणी स्थानिक समीकरणे बिघडली. अश्यातच मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे नेते तथा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि चार पिढ्यांचा इतिहास असलेल्या हीरे कुटुंबाचे सदस्य अद्वय हीरे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे पालकमंत्री दादा भुसे आमदार असलेल्या मालेगाव बाह्य मतदार संघाचे समीकरण बदलणार आहे. ठाकरे गटाचाही हीरे यांच्या प्रवेशातून असेच काहीसे आव्हान दादा भुसे यांच्या समोर उभ करण्याचा प्रयत्न आहे.

माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पाडलेल्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी खा. संजय राऊत, विनायक राऊत, उपनेते सुनील बागुल, नाशिक जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आदींसह मालेगाव तालुक्यातील हीरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
दादा भुसेंना आव्हान देतील

अद्वय हीरे यांच्या पक्ष प्रवेशातून पालकमंत्री दादा भुसे यांना त्यांच्याच होम-पिचवर आव्हान निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. अद्वय हीरे यांच्या मागे सहकारी संस्था, शिक्षण संस्था यांचे मोठे बळ आहे. तसेच मालेगाव तालुक्यासह जिल्हयाभरत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सध्या जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या दादा भुसे यांना मतदारसंघातूनच आव्हान मिळाले तर त्यांचे अधिकचे लक्ष मतदारसंघात राहील आणि यातून त्यांना तिथेच खेळवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटणे खेळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -