Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जळगावात राष्ट्रवादीचा बॅनर; आधी खडसेंना विसरले, मग बॅनरवर दिसले

जळगावात राष्ट्रवादीचा बॅनर; आधी खडसेंना विसरले, मग बॅनरवर दिसले

संवाद यात्रेमध्ये खडसेंच्या फोटोवरून विसंवाद

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद यात्रे निमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. या संवाद यात्रेनिमित्ताने जळगाव शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनवरून राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी समोर आली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी गेलेल्या एकनाथ खडसे यांचा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांना फोटो बॅनरवर लावण्याचा विसर पडल्याचे समोर आले. याबाबतचे वृत्त येताच जळगावतील राष्ट्रवादीच्या बॅनवर एकनाथ खडसे अवतरले आहेत. पण यामुळे पक्षातील ‘जुने विरुद्ध नवे’ हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रे निमित्ताने जळगाव शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर शरद पवारांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो दिसले. पण या बॅनरवर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांचा फोटो गायब झाल्याचे समोर आले. काल रात्रीपर्यंत या बॅनवर एकनाथ खडसे यांचा फोटो नव्हता. मात्र याबाबत बातम्या समोर येताच राष्ट्रवादीच्या बॅनरवर खडसेंचा फोटो दिसला.

भुसावळमधले राष्ट्रवादीचे बॅनर हटवले

- Advertisement -

एकाबाजूला राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद दिसून आला, तर दुसऱ्या बाजूला भाजपने भुसावळमधील राष्ट्रवादीचे बॅनर काढल्याचे समोर आले. जयंत पाटलांच्या भुसावळ दौऱ्यानिमित्ताने लावले शुभेच्छा देणारे बॅनर्स भाजपने काढून टाकले. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व असून एकूण २०७ राष्ट्रवादीचे बॅनर हटवण्यात आले आहेत. त्यामुळे भुसावळमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.


हेही वाचा – एकनाथ खडसेंची बालेकिल्ल्यातच कोंडी? संवाद यात्रेच्या बॅनरवर खडसे गायब


- Advertisement -