घरमहाराष्ट्रअखेर सलीम मखानींच्या मदतीला धावले जितेंद्र आव्हाड

अखेर सलीम मखानींच्या मदतीला धावले जितेंद्र आव्हाड

Subscribe

लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतील त्यांच्या रथाचे सारथी सलीम मखानी यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड धावून आले आहेत. सलीम मखानी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या फुफुसांना इन्फेक्शन झालं आहे. काल ४ जुलैला त्यांना डोंबिवली शास्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र बेड न मिळाल्याने खोळंबून रहावं लागलं. प्रयत्न करुनही बेड मिळाला नसल्याने त्यांना शास्त्री नगर रुग्णालयामध्ये खुर्चीवर ऑक्सिजन सिलेंडर हातात धरून बसून रहावं लागलं.

salim makhani

- Advertisement -

याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना रात्री मिळाली. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने बेड मिळवून दिला. शिवाय, दोन महागडी इंजेक्शन्स पाठवून दिली. एक ४० हजार किमतीचे आहे. अशी दोन इंजेकशन्स आव्हाड यांनी रात्री अडीच वाजता सलीमभाई यांच्यासाठी मोफत दिली. तसंच अजून लागली तर सांगा असंही सांगितलं. सलीम मखानी आता भायखळा येथील मदिना रुग्णालयात आहेत. आता थोडासा आराम मिळाला असल्याचं सांगितलं आहे. सलीम मखानी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेत त्यांच्या रथाचे सारथी होते. सलीम मखानी यांचे सर्व राजकीय मंडळींशी जवळचे संबंध असून त्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न सर्व सामान्य डोंबिवलीकर विचारत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -