घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखेर! प्रशासन दाखल झाले 'त्या' गाव विक्रीला काढलेल्या गावकऱ्यांच्या दारात

अखेर! प्रशासन दाखल झाले ‘त्या’ गाव विक्रीला काढलेल्या गावकऱ्यांच्या दारात

Subscribe

नाशिक : “कांदा उत्पादक माळवाडीकरांनी गाव काढले विकायला” अशा आशयाचे वृत्त सोमवारी (दि. ६) रोजी प्रशिध्द होताच त्याची दखल घेऊन मंगळवारी (दि. ७) रोजी येथे निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन उपस्थित शेतकर्‍यांच्या समस्या जाऊन घेतल्या व त्या शासन दरबारी पाठविण्याचे यावेळी आश्वासन दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कांद्यासह इतर शेतमालाला भाव नसल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यामुळे शेती व्यवसाय करणे जिकरीचे बनल्याने तालुक्यातील माळवाडी येथील शेतकर्‍यांनी चक्क गावच विकायला काढल्याचा निर्णय घेतला. गावात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जात आहे. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला भाव नाही. माळवाडी आणि फुलेमाळवाडी गावांसह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह करतात, यात शेतकरी कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, लग्न आणि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपल्बध होत नाही.

- Advertisement -

तसेच, दैनंदिन गरजा व खासगी सरकारी बँक कर्ज चुकती करण्यासाठी आज रोजी कुठलाही पर्याय उरला नसल्या कारणाने माळवाडी येथील संपूर्ण शेतकरी एकत्रित येऊन त्यांनी संपूर्ण गावच विकण्याचे ठरवले. शासनाने शेतकर्‍यांच्या गरजा भागवण्यासाठी व कर्ज मुक्त करण्याइतके शेती उत्पादित मालाला भाव मिळवून द्यावा. अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे ते सरकाने विकत घेण्याची मागणी शेतकरी प्रवीण बागुल, अमोल बागुल, राकेश सोनवणे, अविनाश बागुल आदी शेतकर्‍यांनी सोमवारी (दि. ६) रोजी एका ठरावाद्वारे केली. हे वृत्त प्रसिद्ध होताच निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी भेट देऊन उपस्थित शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले. यावेळी फुले माळवाडीचे सरपंच हिरामण शेवाळे, माळवाडीचे सरपंच शिवाजी बागुल, कांदा उत्पादक शेतकरी अविनाश बागुल, अमोल बागुल, अक्षय शेवाळे, शहाणा बागुल, गनू बागुल, प्रवीण बागुल, महेंद्र बागुल, किशोर बागुल, बाळासाहेब बागुल, राकेश सोनवणे, राजू बच्छाव, तलाठी अमोल येशी , संजय बागुल, अनिल गोसावी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -