घरमहाराष्ट्रयाच दिवसाची वाट पाहात होतो – ललित साळवे

याच दिवसाची वाट पाहात होतो – ललित साळवे

Subscribe

ललिता साळवे म्हणून रुग्णालयात दाखल झालेला ललित आपली खरी ओळख घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडला. आजपासून कामावर रुजू झालेल्या ललितची प्रतिक्रिया

‘माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस आहे. ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होतो तो दिवस अखेर आज आला. मी आजपासून माझ्या ड्युटीवर रुजू झालो आहे, त्याचा अत्यंत आनंद होतोय’, अशी प्रतिक्रिया ललित साळवे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली आहे.

जन्मत: मुलगा असूनही लहानपणापासूनच मुलगी म्हणून वाढलेल्या ललितवर २५ मे २०१८ ला लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १२ जूनला दुपारी ललितला डिस्चार्ज देण्याची सर्व प्रक्रिया झाली आणि ललिता साळवे म्हणून रुग्णालयात दाखल झालेला ललित आपली खरी ओळख घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडला.

- Advertisement -

आजपासून त्याच्या खऱ्या आयुष्याची सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियानांही खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया ललितच्या भावाने दिली आहे. तर, ललितने आतापर्यंत एवढा संघर्ष करुन अखेर त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केल्याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया ललितचे वडील मधुकर साळवे यांनी दिली आहे.

अखेर स्वप्न पूर्ण झालं 

१२ जूनला सेंट जॉर्ज रुग्णालयातून घेतलेल्या डिस्चार्जनंतर ललितने ७ दिवसांत पुन्हा एकदा माझलगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ड्यूटी जॉईन केली. २०१७ पासून ललिताची ललित होण्याची धडपड सुरू होती. आपण मुळातच पुरूष आहोत याची जाणीव होत असल्यामुळे शस्त्रक्रिया करुन घेतली. शस्त्रक्रियेचा त्रास होतो आहे. पण, माझ्या आनंदापुढे हा त्रास मला काहीच वाटत नाही. माझ्या खऱ्या आयुष्याच्या दिशेने आजपासून माझी वाटचाल सुरू झाली आहे. ड्युटीवर रुजू होत असताना माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनीही मला खूप चांगला सपोर्ट केला. त्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे, असेही ललितने सांगितले.

Lalit Salve
ललित साळवे
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -