घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : अर्थमंत्री सीतारामन यांचा 'शेवटचा' अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray : अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘शेवटचा’ अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंचा टोला

Subscribe

अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांचा 'शेवटचा' असणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पेणमधील सभेतून लगावला आहे.

पेण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांचा ‘शेवटचा’ असणार आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी ‘शेवटचा’ या शब्दावर जोर देत आम्हाला तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असेही म्हटले आहे. (Finance Minister Sitharaman’s ‘Last’ Budget, Uddhav Thackeray Troll Central GovernmentUdd)

आगामी लोकसभेच्यादृष्टीने शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात आजपासून (ता. 01 फेब्रुवारी) रायगडमधील पेण येथून झाली आहे. मतदारसंघ बांधणी करणे, मतदारांशी, जनतेशी संवाद या दौऱ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे करणार आहेत. पेणमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा… Pratibha Pawar : नातवासाठी आजी मैदानात! रोहित पवारांची ईडी चौकशी अन् प्रतिभा पवार NCP कार्यालयात

पेणमधील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, सुट्टी नाही. गेल्या 15 दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो होतो. तुम्ही मातोश्रीवर येत आहात. मी विचार केला. पण आता आपण जाऊन तुम्हाला भेटू, म्हणू आज आलो. कल्याणमध्ये मागच्यावेळी शाखा भेटी ठरवल्या आणि अशा सभाच झाल्या. सर्व विधानसभा मतदारसंघात जाऊन जनतेला भेटणार आहे. त्याची सुरुवात रायगड जिल्हा पेणपासून झाली आहे. आज आपण बोलत आहोत. संवाद साधत आहोत. त्याचवेळी देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. काय बोललो मी… शेवटचा अर्थसंकल्प. निर्मला सीतारामन यांनी जड अंतःकरणाने हे कार्य पार पाडले. शेवटचा का होईना त्यांनी अर्थसंकल्प मांडला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, असे ठाकरेंकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, सीतारामन यांना आणखी एका गोष्टीबद्दल धन्यवाद देतो. मी अर्थ संकल्प वाचला नाही. पेणमध्ये दाखल होत असताना ऑनलाइन ज्या हायलाईट येतात त्या वाचल्या. त्यांनी सांगितले चार जातींसाठी काम करणार. त्या कोणत्या तर गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. कारण त्यांनी या चार जातींबद्दल बोलून मोठे धाडस केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधानांसमोर महिला, शेतकरी, तरुण आणि गरिबांबद्दल बोलण्याचे धाडस दाखवले त्यामुळे मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो, असा टोला उद्धव ठातरेंनी यावेळी लगावला.

तर, निवडणुका आल्यावर का होईना सुटाबुटातील मित्र म्हणजे देश नाही, हे त्यांना कळाले आहे असेच दिसते. तरुण, शेतकरी आणि महिला म्हणजे हा देश आहे हे त्यांना कळले हे नशीब. 10 वर्ष झाली. 10 वर्षात या जाती तुम्हाला कळल्या. तुमच्यासोबतचे अदानी म्हणजे देश नाही. त्यांच्यासाठी 10 वर्ष खर्च घातली तो म्हणजे देश नाही. तुम्ही महिलांकडे लक्ष देत आहात. तर मणिपूरमध्ये का जात नाही? मणिपूरमध्ये जा आणि तिथल्या महिलांना सांगा देशात महिला आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. आता आम्हाला कळले. निवडणुकांमध्ये महिलांची मते पाहिजे आहेत, म्हणून सांगतो की हे महिलांसाठी कामे करणार, असे टीकास्त्र यावेळी त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर डागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -