घरमहाराष्ट्रअपघातग्रस्त खासगी वाहनांतील प्रवाशांना आर्थिक मदत मिळावी

अपघातग्रस्त खासगी वाहनांतील प्रवाशांना आर्थिक मदत मिळावी

Subscribe

भारतीय राज्यघटने प्रमाणे भारतातील सर्व नागरिकांना समान अधिकार आहे. त्यामुळे बस आणि रिक्षा अपघातात बसमधील मृत व्यक्तींच्या वारसांना ज्याप्रमाणे १० लाखाची मदत मिळते, त्याचप्रमाणे रिक्षामधील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी दहा लाखाची आर्थिक मदत मिळावी व मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका वारसाला शासकीय सेवेत नोकरी देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. सध्या तरी अपघातातील खासगी वाहनातील मृतांच्या वारसांना १० लाख देण्याची शासकीय धोरणात तरतूद नाही, पण यासंदर्भात विभागातील अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा व विचार विनिमय करुन शासकीय धोरण आणण्याबाबत नक्की विचार करु ,असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिले.

नाशिक जिल्ह्यातील सौंदाणे- देवळा रस्त्यावर कळवण-धुळे येथे झालेल्या एसटी बसच्या विचित्र अपघातात बसमधील १७ व रिक्षामधील ९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याविषयी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेवर बोलताना दरेकर यांनी सांगितले की, बस दुर्घटनेत मृत पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये व रिक्षा प्रवासातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत दिली जाते. मग बस प्रवासी आणि रिक्षा प्रवासी या दोघांना वेगवेगळे न्याय का? हा दुजाभाव का…तसेच वाहनांचे अपघात का होतात कसे होतात याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या गाड्यांचे फक्त मॉडेल बदललेले आहे. पण या गाड्यांचे इंजिन तेच आहे. यामुळे राज्यात एसटी बसेसच्या अपघातात वाढ झाली आहे आवश्यकता आहे.

- Advertisement -

तसेच एस.टी स्टँडवर एस.टी कर्मचार्‍यांच्या शौचालय,भोजन आणि राहण्याची योग्य सोय नाही.शेकडो प्रवाशांचे जीव मुठीत घेऊन सुखरूप प्रवास करणार्‍या वाहन चालक,कंडक्टरांची दुरवस्था आहे.एस.टी स्टँडवर कर्मचार्‍यांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी राज्याच्या परिवहन खात्याने पुढाकार घेऊन एस. टी स्टँडचे सुशोभीकरण प्रस्तावित करावे अशी मागणीही दरेकर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -