Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी पुणे : होर्डिंग कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 3 लाखांची आर्थिक मदत

पुणे : होर्डिंग कोसळून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 3 लाखांची आर्थिक मदत

Subscribe

होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील किवळे, देहूरोड परिसरात घडली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना तीन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील किवळे, देहूरोड परिसरात घडली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना तीन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Financial assistance of 3 lakhs from the CM to the families of those who died due to hoarding collapse in Pune vvp96)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आर्थिक मदत जाहीर केली आहे. “कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास किवळे, देहूरोड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी होर्डींगच्या आडोशाला थांबले होते. मात्र त्यावेळी जोरदार वाऱ्यामुळे ज्या होर्डिंगखाली आसरा घेतला होता. तेच होर्डिंग कोसळले. त्यामुळे होर्डिंगच्या खाली थांबलेले काहीजण त्याखाली अडकले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने कोसळलेलं होर्डिंग हटवून जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. सहा क्रेनच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झालेली आहे. बचावकार्यासाठी स्थानिकांचीही मदत होत आहे. बचाव पथकाने एकाला सुखरुप बाहेर काढल्याची माहिती आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अवकाळी पावसाचा पुण्याला फटका; होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू

- Advertisment -