घरताज्या घडामोडीसरकारविरोधातील मोर्चात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदत

सरकारविरोधातील मोर्चात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदत

Subscribe

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र या मोर्चातील पुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र या मोर्चातील पुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, ५ लाखांचा धनादेश पुंडलिक जाधव शेतकरी पुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. (Financial help from Chief Minister Shinde to the families of those who died in the anti government march)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक जाधव असे मृत्यू झालेल्या शेतकाऱ्याचे नाव होते. पुंडलिक जाधव हे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माहुडी गावाचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आंदोलक शेतकऱ्यांनी शहापूर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या भेटीदरम्यान मृत्यू झालेल्या नागरिकाच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत जाहीर 

दरम्यान, राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शहापूर येथील एक नागरिक मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या नागरिकाच्या कुटुंबियांनाही 5 लाखांची मदत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

त्याशिवाय, आणखी एक शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जात होता. त्याचाही मृत्यू झाला. त्या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे त्याचा घरावर आर्थिक संकट ओढावले, मात्र त्या शेतकऱ्याचे उद्ध्वस्त झालेले घर पुन्हा बांधून देणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.


हेही वाचा – भारताचे संविधान कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठ ही भाजपाची भूमिका – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -