Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जाणून घ्या, अँटिलीया स्फोटक प्रकरण ते मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या...

जाणून घ्या, अँटिलीया स्फोटक प्रकरण ते मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी

मनसुख हिरेन प्रकरणात आतापर्यंत काय घडले

Related Story

- Advertisement -

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांसह एक स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या गाडीमध्ये १७ जिलेटीनच्या कांड्या होत्या. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए करत आहे. तर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चरोजी ठाण्यातील मुंब्रा खाडीत सापडला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत विनायक शिंदे,नरेश गोरे आणि आता सुनिल माने यांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत सचिन वाझेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंबनी स्फोटक प्रकरणात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी 

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. याबाबत स्थानिकांनी मुंबई पोलिसांना कळविले होते. मुंबई पोलिसांनी कारावई केल्यानंतर १७ ते २० जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. यानंतर आतंकावादी संघटनेचे एक धमकीचे पत्र पोलिसांना मिळाले होते. तसेच या प्रकरणात ४ खोट्या नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. गाडी सापडल्याची तक्रार गावदेवी पोलिस स्थानकात करण्यात आली होती. अंबानी स्फोटक प्रकरणात सुरुवातील एपीआय सचिन वाझे (मुख्य आरोपी) तपास करत होते. यानंतर २७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांनी आपणच स्कॉर्पिओचे मालक असल्याचे सांगत जबाब नोंदवला होता.

- Advertisement -

मनसुख हिरेन यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, १७ फेब्रुवारीला विक्रोळी येथून गाडी चोरीला गेली. याबाबत मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याचेही मनसुख हिरेन यांनी जबाबत नोंदवले आहे. तसेच ही स्कॉर्पिओ गाडी आणि इनोवा गाडी अंबनींच्या घराबाहेर २.१८ वाजता पार्क करण्यात आली होती. या दोन्ही गाड्या मुलुंड, ठाणे मार्गे रवाना झाल्या होत्या तसेच रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडी चालक यांचे चेहरे दिसले नाहीत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी लावल्यानंतर स्कॉर्पिओचा चालक इनोवा गाडीत बसून घटनास्थळावरुन रवाना झाल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये दिसले आहे.

स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांना ४ मार्चला फोन आल्यानंतर ते घरुन बाहेर निघतात. यानंतर त्यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडीत सापडला. हिरेन यांच्या देहावर अनेक व्रण होते तसेच त्यांच्या तोंडात सफेद रुमाल कोंबण्यात आले होते. सुरुवातील मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याचे मानण्यात येत होते परंतु मनसुख यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केला असल्याची तक्रार केली. तसेच मनसुख हिरेन यांच्या अहवालात ते खाडीत फेकले गेले तेव्हा जिवंत असल्याचे आढळले यामुळे सचिन वाझे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आले होते.

- Advertisement -

मनसुख हिरेन प्रकरणात ७ मार्चला एटीएसने तपास सुरु केला. यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे पुनरावृत्ती एनआयए आणि एटीएसने केली. तसेच १३ मार्चला सचिन वाझे यांना अंबानी स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोट सचिन वाझे यांनीच ठेवली असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले होते. १३ ते २५ मार्चपर्यंत सचिन वाझे यांना एनआयए कस्टडीत ठेवण्यात आले होते. या दरम्यान एनआयएच्या तपासाला गती आली आणि या प्रकरणात अनेक पुरावे तसेच घटना घडत गेल्या. स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांनी गाडी पार्क केली असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यांना मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या कार्यालयातून सीपीयू, दोन मोबाईल,काही कागदपत्रे,तसेच त्यांची मर्सिडिज गाडी जप्त करण्यात आली यानंतर मुंबई पोलिस कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी असलेली इनोवा कारही ताब्यात घेण्यात आली.

सचिन वाझे यांना सर्व घटनास्थळी नेऊन एनआयएने घटनेचे नाट्य रुपांतर केले आहे. सचिन वाझे यांना पीपीई कीट घालून मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोरही चालायला लावले होते यावेळी मुंबई पोलीस आणि एनआयएची पथक घटनास्थळी उपस्थीत होते.

या प्रकरणात सचिन वाझे ज्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते त्यांची बदली करण्यात आली आणि त्याच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्त करण्यात आली. यानंतर परमबीर सिंह यांनी गृहंत्री याच्याविरोधात १०० कोटी रुपये खंडणी जमा करण्याचे टार्गेटचा आरोपाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. यानंतर वाझेंना मदत करणारे २१ मार्चला एटीएस ने मनसुख हिरेन तपास एनआयएकडे सोपवण्यास सांगितले. त्यामुळे आता मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे. अंबानी प्रकरणात आतापर्यंत सचिन वाझे यांच्या ५ गाड्या महागड्या चारचाकी गाड्या जप्त करण्यात आला आहेत. तर एक बाईक जप्त केली असून या बाईकची किंमत तब्बल ७ लाख आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात आतापर्यंत काय घडले

एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याची जबाबदारी स्विकारण्यास सांगितले होते. परंतु हिरेन यांनी नकार दिला. आतापर्यंतच्या तपासात असे उघड झाले आहे की, मनसुखच्या दबावाखाली येऊन सत्य उघडकीस येईल याची भीती सचिन वाझे यांना होती. म्हणून मनसूख हिरेन यांना जिवे मारण्याचा कट सचिन वाझे यांनी रचला. २ मार्चला सचिन वाझे यांनी पोलिस मुख्यालयात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत हिरेन यांच्या हत्येचा कट रचला आहे. सचिन वाझे यांनी स्वतःवर संशय येऊ नये म्हणून सरकारी गाडी वापरण्याचे टाळले रेल्वेने प्रवास केला, फोन वापरला नाही. मनसुख यांना पोलीस अधिकारी सुनिल माने यांनी ३ मार्चला फोन केला. एका बोगस सिमकार्डच्या आधारे फोन कॉल करण्यात आले. आरोपी विनायक शिंदे, सचिन वाझे यांनी मनसुख यांना गाडीतच बेशुद्ध केले होते. यानंतर त्यांचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याचे दाखवण्याचा कट सचिन वाझे यांचा फसला. मनसुख हिरेन प्रकरणात नुकतेच सुनिल माने यांना एनआयएने अटक केली आहे. तसेच सुनिल माने यांची गाडीही जप्त केली आहे. मनसुख यांना बोलावण्यासाठी सुनिल मानेंनी गावडे म्हणून फोन केला होता.

- Advertisement -