विनयभंगाचा गुन्हा केव्हा दाखल होतो, कायद्यात शिक्षेची तरतूद काय?

विनयभंगाचा गुन्हा केव्हा दाखल केला जातो हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसंच, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई होते हे जाणून घेऊयात.

threatens and obscene messages sent to the bhojpuri actress

मुंबई – कळव्यातील एका पुलाच्या उद्घाटनादरम्यान भाजपा महिला पदाधिकारी रिदा राशीद यांना धक्काबुक्की करण्यात आली. मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रिदा राशीद यांच्या हाताला धरून पुरुषांच्या अंगावर ढकललं असा दावा रिदा राशीद यांनी केलाय. याप्रकरणी रिदा काशीद यांच्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा केला आहे. पण, विनयभंगाचा गुन्हा केव्हा दाखल केला जातो हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तसंच, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यास त्यांच्यावर काय कारवाई होते हे जाणून घेऊयात. (When is the offense of molestation filed)

हेही वाचा – मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला…; ऋता आव्हाडांचा संताप

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ३५४ कलमाअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, अशी जबरदस्ती करणे या गुन्ह्यासाठी ३५४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. केवळ स्त्री तक्रार दाखल केली आहे म्हणून गुन्हा नोंदवला जात नाही. त्यासाठी तक्रारीनुसार संबंधीत तक्रारदार महिलेा तिला लज्जा उत्पन्न करणारी, तिच्या सभ्यतेला बाधा आणणाऱ्या कृत्यांचा पुरावा सादर करावा लागतो. सदर घटना सिद्ध झाल्यानंतरच शिक्षा सुनावली जाते. हा गुन्हा दखलपात्र असतो. गुन्हा सिद्ध झाल्यास २ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली जाते.

हेही वाचा – आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवार, सुप्रिया सुळेंकडून ही विनंती, आदर्श आमदार म्हणून…

कलम ३४९ ते ३५४ महिलांच्या हितासाठी तयार करण्यात आलेला आहे. सार्वजनिक जीवनातील नैतिक आणि सभ्य वर्तनाशी संबंधित हे कायदे आहेत. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्याप्रकरणी ३४९ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. गुन्हा करण्याच्या हेतुने केलेली परवानगीशिवाय जबरदस्तीसाठी कलम ३५०चा वापर केला जातो. कलम ३५१ अंतर्गत जाणीवपूर्वक केलेले शाब्दिक आणि शारीरिक वार यासंदर्भात गुन्हा दाखल केला जातो. कलम ३५२ नसुार गुन्ह्यांना ३ महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि १०० रुपये दंड ठोठावला जातो. कलम ३५३ नुसार सरकारी कामात व्यत्यय आणणे आणि ३५४ अंतर्गत एखाद्या स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल अशी जबरदस्ती करणे असे गुन्हे नोंदवले जातात.