घरमहाराष्ट्रभाई जगताप यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा

भाई जगताप यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा

Subscribe

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन करुन मानवी साखळीचे आयोजन केल्याप्रकरणी कारवाई

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन करुन मानवी साखळीचे आयोजन केल्याप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह ५० कार्यकर्त्यांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पेट्रोल दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी जमावबंदीचे उल्लघंन केले तसेच मास्क न वापरता, सुरक्षित अंतर न ठेवता साथ रोग प्रतिबंधक तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलमांचे उल्लघंन केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना भाई जगताप आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. जगताप यांनी एका पोलिसाला धक्का दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -