Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा

कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या माजी खासदार महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही शहरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम यासाठी नियमावली देखील ठरवून दिली आहे. मात्र, असे असताना देखील काही राजकीय मंडळींकडूनच कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाचा विवाह पडला महागात

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाबाबत सूचना करत असताना दुसरीकडे मात्र, त्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह मोठ्या थाटामाटत पुण्यात पार पडला. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे यावेळी हजारोंच्या संख्येने लोक या सोहळ्यात दाखल झाले होते. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. तर बऱ्याच जणांनी तोंडाला मास्क देखील लावले नव्हते. दरम्यान, याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि निरीक्षक बाळकृष्ण कदम अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे कोरोनाचे राजकीय नेत्यांनाच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी आमदार सरोज आहेर यांच्या मुलाचे ही मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील उपस्थिती लावली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाल्याचे २२ फेब्रुवारी रोजी समोर आले. त्यामुळे भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.


हेही वाचा – वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला रवाना, समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन


- Advertisement -

 

- Advertisement -