दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने सुनेचा छळ; विद्या चव्हाणांवर गुन्हा दाखल

विलेपार्ले पोलीस ठाण्यात सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुंटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fir booked against ncp mla vidya chavan and her family for harassment of her daughter in law
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण

दुसऱ्यांदाही मुलगी झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि कुटुंबियांनी छळ केल्याचा आरोप सुनेकडून करण्यात आला आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी विद्या चव्हाण यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विलेपार्ले पोलीस स्थानकात सूनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण त्यांच पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा पती), दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी विलेपार्ले पोलीस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये सूनेचा छळ केल्याप्रकरणी दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुसरी मुलगी झाल्यामुळे चव्हाण कुटुंबिय पीडितेचा छळ करत होते. ‘मुदतीपूर्वीच प्रसूती झाल्यामुळे हे बाळ दगावलं. यानंतर माझा घरच्यांकडून अधिकच छळ होऊ लागला’, असं पीडितेने तक्रारीत नमूद केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.


हेही वाचा – नोटबंदीनंतरच्या वर्षात राज्यात ३१७ कारखाने बंद; १४,७८७ कामगार बाधित