Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन : भाजपच्या गोपिचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन : भाजपच्या गोपिचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

जेजुरी देवस्थानच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या प्रयत्न केल्यासाठी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी गोपिचंद पडळकर यांनी जेजुरी येथे जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. या शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन कऱणे आणि पोलिसांशी झटापट करणे या कामासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

वारंवार राष्ट्रवादीला अंगावर घेणारे भाजपचे गोपिचंद पडळकर यांच्या शुक्रवारी भल्या पहाटेच आणखी एका स्टंटमुळे चर्चेत आले आहेत. आज शुक्रवारी पहाटेच जेजुरीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या संस्थानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रताप गोपिचंद पडळकर यांच्याकडून झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवार या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याआधीच भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रताप केला. पुतळ्याचे अनावरण करताना गोपिचंद पडळकर यांच्यासोबतचे कार्यकर्ते आणि संस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्याचवेळी पडळकर यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे. पुन्हा एकदा थेट राष्ट्रवादीला शिंगावर घेत असल्याचे उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडळकरांवरून नाराजी आहे. त्यातच आज पडळकर यांनी ऱाष्ट्रवादीच्या शरद पवारांवरही गंभीर टीका केली आहे.

- Advertisement -

जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानाने अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला आहे. या पुतळ्याचे अनावरण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे हेदेखील या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. पण त्याआधीच गोपिचंद पडळकर हे कार्यकर्त्यांसह आज पहाटेच जेजुरीत दाखल झाले. त्यानंतर पुतळ्याच्या ठिकाणी त्यांनी सजावट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात पडळकरांसोबतचे कार्यकर्ते आणि संस्थानचे कर्मचारी यांच्यातही झटापट झाली. अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचे सांगत पडळकर त्याठिकाणाहून निघून गेले.

शरद पवारांवर पडळकरांची टीका

अखंड भारताचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हा जेजुरी संस्थानने उभारला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समाजासाठी काम केले आहे. त्यांचा पुतळा उभारण्याचे संस्थानचे चांगले काम आहे. या पुतळ्याचा अनावरणाला आमचा विरोध नाही. पण भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये. भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या माणसाच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणे हा अहिल्यादेवींचा अपमान असल्याचे पडळकर म्हणाले. शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा, कारण यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळेच या पुण्यश्लोक पुतळ्याच्या पायावर डोक ठेवून उद्घाटन झाले असे आम्ही जाहीर करतो.


- Advertisement -

 

- Advertisement -